Click to change the language

  

#
#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी : महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता, दि.२३ ते २९ डिसेंबर २०२१ दरम्यान प्रेरण कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला .कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ.डी. आर. पानगव्हाणे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करणात आले .प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी महाविद्यालाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विश्लेषण केले व प्रेरण कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगितला .विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता उपयुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांच्या शैक्षणिक आवडी आणि उपक्रमांना प्रोत्साहन देणे ,शिक्षकांमध्ये नातेसंबंध निर्माण करणे, एक निरोगी दैनंदिनी तसेच, एकमेकात प्रेम संघभावना,आत्मविश्वासाची भावना, संवेदनशीलता आणि स्वत: ची समज विकसित करून स्वयंम प्रेरना तयार करणे व सार्वत्रिक मानवी मूल्ये वाढी करता मार्गदशन हा कार्यक्रमाचा उद्देश होता.

प्रेरण कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) चे प्रमुख पाहुणे डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यांकन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने उदिष्ठ साध्य करणेकरिता मेहनत करण्याकरिता प्रेरित केले. अभ्यासात सातत्य ठेवून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे व अभियंता म्हणून नवनवीन उपक्रम हाती घेऊन राष्ट्र बांधणीच्या कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी सर्व विभागप्रमुखांनी डॉ. एस. यु. घुमरे, डॉ. एन.एस.नेहे , डॉ. एम.एस. नागमोडे, डॉ. एस. ए. सोनवणे , डॉ. डब्लु. एम. देऊळकर, डॉ. एम. जे. पाबळे, डॉ यु. एस. काकडे शाखानिहाय महाविद्यालयातील प्रत्येक शाखेचे महत्व विषद करून प्रत्येक शाखेकरीता महाविद्यालयात असलेल्या सुविधाबाबत मार्गदर्शन व सादरीकरण केले.

प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी डॉ.एस. एस. देशपांडे , श्री. एस. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट वाढले असून सदरील वाढीकरिता महाविद्यालय करत असलेल्या उपाय योजना ,प्लेसमेंट रेकॉर्ड, प्लेसमेंटचे नियम याबाबत मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी डॉ.एस. व्ही. करमारे यांनी अभियांत्रिकीच्या परीक्षेसंबंधी नियम, परीक्षा अर्ज भरणे साठी मार्गदर्शक तत्त्वे व ग्रेड सिस्टम बाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्रबंधक श्री.सी.ए. सुर्यवंशी व त्यांचे सहयोगी यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजात येणाऱ्या अडचणींबाबत प्रवेश प्रक्रिया,शिष्यवृत्ती, महाडीबीटी, आयकार्ड, बोनाफाईड, एजुकेशन लोन आणि डीपीयू नोंदणी प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.कर्मशाळा अधीक्षक श्री जी .एस.दातार यांनी कार्यशाळेत उपलब्ध असलेल्या सुविधा, परवानगी व नियम व सुरक्षा नियम संबंधित माहिती सादर केली .

प्रभारी ग्रंथपाल डॉ.एम.जे.शेख यांनी महाविद्यालयात असलेल्या ग्रंथ संपदेच्या उपलब्धतेबाबत तसेच ऑनलाइन ई.बुक्स, स्पर्धापरीक्षा बाबत उपलब्ध सुविधा,ग्रंथालयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच. डॉ. एस. एन. माढेकर यांनी महाविद्यालयातील वार्षिक नियतकालिक या बद्दल माहिती दिली. डॉ एम. जे. पाबळे व श्री व्ही. वाय. ढेपे यांनी उद्योजकता विकास ,स्टार्ट अप सेंटर, आयएसटीई, एनपीटीईएल, याबाबत मार्गदर्शन केले.श्री. एन. व्ही. साळी यांनी जिमखाना संबधीत माहिती सादर केली. कुलमंत्री श्री. एन. एम. कराजनगी व श्रीमती डॉ .के व्ही. ठाकुर (मुलांचे व मुलींचे वसती गृह) ,यांनी वस्तीग्रहाचे नियम व वस्तीग्रहात पुरवण्यात येणाऱ्या सुविधाबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. एन.पी.फुटाणे यांनी रोबोकॉन क्लब व ई-यंत्र प्रयोगशाळा याचे उद्दीष्ट, उपलब्ध सुविधा, संघ निवड प्रक्रिया,महविद्यालयाचे रोबोकॉन स्पर्धेतील यश याबाबत मार्गदर्शन केले. श्री एम. डी. पांचाळ व श्रीमती पी. व्ही. डामरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे व श्री. के. एच. कौडिकी यांनी उन्नत भारत अभियान योजनेचे महत्व विषद केले व अद्याप पर्यत झालेल्या कार्यक्रमांची माहिती सादर केली..

श्री.ए. जे. भोसले , श्री.ए. एस. कौसल , श्री. जे. एम. अरकल यांनी बाहा,सुप्रा,तिफन, ई-बाईक आणि गो-कार्ट (BAJA,SUPRA, TIFAN,E-BIKE, Go-Cart) या स्पर्धांची माहिती, संघ निवड, महविद्यालयाचे स्पर्धेतील यश आणि बक्षिसे याबाबत सादरीकरन केले. श्री एन.एम.काराजंगी यांनी विविध योगासने त्यांचे फायदे सादर केले. सार्वत्रिक मानवी मूल्ये बाबत विभाग निहाय अध्यापकाकडून मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रेरण कार्यक्रमाच्या आयोजनामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे. प्रेरण कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता समन्वयक म्हणून डॉ. एम. आर. बोनगुलवार, श्री एन.डी. पडवळे,श्री. के. बी. बनसोडे, श्रीमती एच. एच. राक्षे ,श्री व्ही .पी .जाधव यांनी काम पाहीले.

प्रेरण कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) चे प्रमुख पाहुणे डॉ. महेश काकडे,(संचालक, परीक्षा व मुल्यांकन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
https://www.Symptoma.es
Website last updated on: